पोलीस महासंचालकांच्या हस्ते ‘मुंबईतील गुन्हेगारीचा एन्सायक्लोपीडिया’ पुस्तकाचे प्रकाशन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

दै. ‘सामना’चे सहाय्यक संपादक प्रभाकर पवार लिखित ‘मुंबईतील गुन्हेगारीचा एन्सायक्लोपीडिया’ या पुस्तकाच्या सहाव्या आवृत्तीचे प्रकाशन महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांच्या हस्ते नुकतेच पार पडले.

यापूर्वी पोलीस डायरी (मराठी व गुजराती आवृत्ती), मुंबईतील रक्त गोठविणारी गुन्हेगारी, गँगवॉर ते बॉम्बस्फोट, मुंबई ज्वालामुखीच्या उंबरठय़ावर, मुंबई माफिया (हिंदी) पंचनामा आदी पुस्तकांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले असून ‘मुंबईतील गुन्हेगारीचा एन्सायक्लोपीडिया’ या त्यांच्या पुस्तकाला प्रचंड प्रतिसाद मिळाल्यानंतर त्याच्या सहाव्या आवृत्तीचे प्रकाशन पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांच्या कार्यालयात पार पडले. त्या वेळी पोलीस महासंचालक म्हणाले, ‘‘प्रभाकर पवार यांनी लिहिलेले हे पुस्तक खरोखरच नावाप्रमाणे ‘एन्सायक्लोपीडिया’ आहे.’’ अत्यंत वाचनीय असे हे पुस्तक आहे, असेही त्यांनी सांगितले. याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार ऍड. निखिल दीक्षित आदी प्रमुख मंडळी उपस्थित होती.

माजी गृहमंत्री आर. आर. पाटील, जयंत पाटील, माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील, माजी पोलीस महासंचालक डी. शिवानंदन, प्रवीण दीक्षित, रॉनी मेण्डोन्सा, अरूप पटनायक, डॉ. सत्यपाल सिंग, राकेश मारिया आदी ज्येष्ठ माजी पोलीस आयुक्तांनी प्रभाकर पवार यांनी लिहिलेल्या सर्व पुस्तकांचे जाहीर कौतुक केले होते.