
स्वत:चे एकतरी पुस्तक प्रकाशित व्हावे, अशी लेखकांची इच्छा असते. नोशन प्रेस या स्वयंप्रकाशन प्लॅटफॉर्मने ही संधी लेखकांना उपलब्ध करून दिली आहे. लेखकांना स्वत:चं पुस्तक प्रकाशित करून त्यातून अर्थार्जनही करता येत आहे. नोशन प्रेस या प्लॅटफॉर्मवर लॉकडाऊनमध्ये 30 हजार लेखकांनी 50 कोटी रुपयांची पुस्तके विकली आहेत.
‘नोशन प्रेस’कर महिन्याला सरासरी दोन हजार पुस्तके प्रकाशित होत आहेत. दर पंचवीस मिनिटांनी एक नवे पुस्तक येत आहे. नोशन प्रेसच्या लेखकांमध्ये 7 वर्षे वयापासून 94 वयापर्यंतच्या लेखकांचा समावेश आहे. विद्यार्थी, लेखक, उद्योजक, नोकरदार, गृहिणी, व्यावसायिक अशा अनेकांनी आपल्या आकडीच्या विषयांवर लिहिलेली पुस्तके तिथे प्रकाशित केली आहेत. इंग्रजी, हिंदी, तमिळसह अन्य प्रादेशिक भाषांमध्ये लेखकांना नोशन प्रेसकर पुस्तके प्रकाशित करता येतात. गूढ, भयकथा, कादंबरी, आत्मकथन, व्यवस्थापन, स्कयंसहाय्यता आणि कविता या सर्वाधिक लोकप्रिय शैली ठरल्या आहेत, अशी माहिती नोशन प्रेसचे सहसंस्थापक, सीईओ नवीन काल्साकुमार यांनी दिली.
























































