आईने पबजी गेम खेळण्यास नकार दिल्याने मुलाची आत्महत्या

43

सामना ऑनलाईन । चंदीगड

सध्या सर्व ठिकाणी ऑनलाईन गेम खेळण्याची क्रेझ सगळ्या तरुणांप्रमाणे लहान मुलांमध्येही वाढत आहे. ब्लू व्हेल, पोकेमॉन गोनंतर आता पबजी या गेमने पुन्हा मुलांना वेड लावल आहे. हरियाणातील जिंद येथे आईने पबजी खेळण्यास नकार दिल्याने 17 वर्षांच्या मुलाने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादयक घटना घडली आहे.

आत्महत्या केलेल्या मुलाने नुकतीच दहावीची परिक्षा देली होती. त्यानंतर तो घरीच होता पण तो सतत मोबाईलवर गेम खेळत होता, असे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले. अनेकदा नातेवाईकांनी आणि कटुंबीयांनी समजवण्याचा प्रयत्न करूनही तो सतत मोबाईलवरच असायचा. नेहमीप्रमाणे शनिवारी पबजी खेळण्यासाठी मोबाईल घेऊन तो खोलीत गेला. त्यावेळी आईने त्याचा हातातील मोबाईल घेतला त्याला पबजी खेळण्यापासून रोखले. त्यामुळे त्याचा राग अनावर झाला आणि खोलीचा दरवाजा बंद करून त्याने गळफास लावून आत्महत्या केली. मात्र, याबाबत आईला काही माहित नव्हते. बराचवेळ झाल्यानंतर तो खोली बाहेर आला नाही म्हणून आई खोलीत गेल्यावर तिला धक्का बसला. त्याने गळफास लावून आत्महत्या केली होती. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. पोलीस याबाबत अधिक चौकशी करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या