युवकाने तरुणीचा आंघोळ करताना काढला व्हिडीओ, ग्रामस्थांनी लावले लग्न

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधीक

सामना ऑनलाईन । लखनौ

एका युवकाने तरुणीचा आंघोळ करताना व्हिडीओ रेकॉर्ड केला. तरुणीच्या कुटुबीयांना जेव्हा ही बाब कळाली तेव्हा चांगलाच गदारोळ झाला. ग्रामस्थांनी त्या तरुणाचे पीडीत तरुणाशी लग्नच लावून दिले.

उत्तर प्रदेशच्या एक तरुणाने शेजारी राहणार्‍या तरुणीचे आंघोळ करताना व्हिडीओ मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला. नंतर हा व्हिडीओ त्याने आपल्या मित्रांनाही पाठवला. जेव्हा तरुणीचा कुटुबीयांना ही गोष्ट कळाली तेव्हा त्यांनी आरोपी तरुणाच्या कुटुबीयांना धारेवर धरले. तोपर्यंत आरोपी मुंबईत फरार झाला होता. दोन्ही कुटुंब एकाच समाजाचे होते. ग्रामस्थांनी मग दोघांचा निकाह लावण्याचा निर्णय घेतला. तरुणाला बोलावून दोघांचे लग्न लावण्यात आले.