न्यायमूर्ती सूर्य कांत होणार सर्वोच्च न्यायालयाचे नवे सरन्यायाधीश, भूषण गवई यांनी केली शिफारस

सरन्यायाधीश भूषण गवई यांनी त्यांचे उत्तराधिकारी म्हणून न्यायमूर्ती सूर्य कांत यांची शिफारस केली आहे. तसे शिफारस पत्र सरन्यायधीशांनी कायदा मंत्रालयाकडे पाठवले आहे.

सरन्यायाधीश भूषण गवई हे 23 नोव्हेंबरला सेवानिवृत्त होणार आहेत. त्यांच्या जागी वरिष्ठतेच्या नियमानुसार न्यायमूर्ती सूर्य कांत हे देशाचे 53 वे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारणार आहेत.