
सामना ऑनलाईन । रिओ दि जानेरो
फुटबॉल विश्वात ‘रेड डेव्हिल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेल्जियमने फुटबॉल विश्वचषकात ५ वेळा विश्वचषक जिंकणाऱ्या ब्राझीलची सांबा दौड २-१अशा गोलने रोखली होती. ब्राझिलच्या या पराभवाने नाराज झालेल्या ब्राझिलियन्स फॅन्सनी मायदेशी परतलेल्या टीमचे अंडी आणि दगडाने स्वागत केले आहे. नाराज चाहत्यांनी टीमच्या बसवर अंडी व दगड फेकले आहेत. दरम्यान भडकलेल्या फॅन्सना टीमच्या बस समोरून हटविण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Brazil Fans ‘Welcome Back’ Players By Throwing Stones At Team Bus. The team was knocked out by Belgium in the #WorldCup pic.twitter.com/k1pGlhjI1U
— Kawowo Sports (@kawowosports) July 9, 2018
पाच वेळा जगज्जेते ठरलेली ब्राझिलची टीम यंदाच्या विश्वचषकात जगजेतेपदाची दावेदार मानली जात होती. मात्र शुक्रवारी झालेल्या उपांत्यपूर्व लढतीत बेल्जियमने मोठा उलटफेर घडवत ब्राझिलला धूळ चाखली. लढतीच्या सुरुवातीला आपला आक्रमक पवित्रा दाखवणारा ब्राझील संघ नंतर मात्र बेल्जियन आक्रमणांच्या दबावात आला. बेल्जियमने खेळात २-०मे आघाडी घेतल्याने बेल्जियन खेळांडूंचा आत्मविश्वास शतगुणित झाला होता आणि पिछाडीवर पडलेल्या ब्राझीलचे स्टार चकवा खाल्ल्यासारखे अनेक सोप्या संधीही वाया घालवत होते. ब्राझीलचा सुपरस्टार नेमार या लढतीत पार निष्प्रभ ठरला.त्याने अनेक संधी वाया दवडल्या. नेमार सारख्या स्टार खेळाडूंचा कुचकामी खेळ व संघाचे लाजिरवाणे पराभव यामुळे ब्राझिलियन फॅन्स प्रचंड नाराज झाले आहेत.































































