तहसील कार्यालयातील कारकुनाला लाच घेताना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । किनवट

तहसील कार्यालय किनवट येथील कारकून धोंडीबा कोकाटे (42) याला 20 हजार रुपयाची लाच स्वीकारताना नांदेड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले.

नांदेड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिल्यावरून तक्रारदारीनुसार, 2015 पासून तक्रारदार धाराशिव येथे बदलीसाठी प्रयत्न करत होते. तहसिल कार्यालय किनवट येथील कारकून थोंडीबा नारायण कोकाटे यांनी मंत्रालयातील अधिकाऱ्यांना सांगून बदली करतो म्हणून तक्रारादार तहसिलमधील चतुर्थश्रणी कर्मचारी गाडी चालक यांच्याकडे 23 हजार 500 रुपयाची मागणी केली. तडजोडीअंती 20 हजार स्वीकारण्याचे मान्य केले. याची माहिती तक्रादाराने एसीबीच्या पथकाला दिली.

बुधवारी तहसील कार्यालय परिसरात लावण्यात आलेल्या सापळ्यात आरोपी लोकसेवक कारकून धोंडीबा नारायण कोकाटे याला तक्रारदाराकडून 20 हजार रुपये लाच घेताना नांदेड लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पथकाने रंगेहाथ पकडले. त्याच्याविरुद्ध कलम 7 भ्रष्टाचार प्रातिबंध अधिनियम ( सुधारीत ) 208 नुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.