पाठवणीच्यावेळी ढसाढसा रडल्याने नवरीला हृद्यविकारचा झटका, जागीच झाला मृत्यू

लग्नानंतर पाठवणीच्या वेळी माहेर सोडून जाणे हा प्रत्येक मुलीसाठी फार कठिण क्षण असतो. त्या क्षणाला तरुणीचे रडणे अनेकांना रडवून जाते. हेच रडणे ओडीशातील एका तरुणीच्या जीवावर बेतले आहे. सदर तरुणीचा पाठवणीच्या वेळी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. काही क्षणांपूर्वी आनंदाचे वातावरण असलेल्या त्या सोहळ्यात मुलीच्या मृत्यूने मातम पसरला.

गुप्तेश्वरी शाहू उर्फ रोझी असे त्या तरुणीचे नाव आहे. रोझी ही जुलुंडा गावात राहायची तिचे तेले या गावातील बिसीकिशन सोबत लग्न ठरले होते. शुक्रवारी त्यांच्या लग्नाचे सर्व विधी आनंदाने पार पडले. मात्र पाठवणीच्या वेळी रोझी आई वडिलांच्या वियोगाने ढसाढसा रडत होती.

रोझीचे माहेरचेही रडत तिला निरोप देत होते. मात्र त्याचवेळी अचानक रोझी बेशुद्ध पडली. तिच्या पतीने व घरच्यांनी तिला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला. मात्र ती शुद्धीवर येत नसल्याने तिला डंगुरीपाली येथील रुग्णालयात नेले. तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषीत केले. ते ऐकून तिच्या आई वडिलांच्या व पतीच्या पायाखालची जमिनच सरकरली. शवविच्छेदन केल्यानंतर रोझीचा मृत्यू हा हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे समोर आले.

आपली प्रतिक्रिया द्या