
प्रभादेवी येथील स्वर्गीय मीनाताई ठाकरे कौशशल्य निकेतनतर्फे ब्युटिशियन आणि नार्ंसग असिस्टंट कोर्समध्ये यशस्वी झालेल्या 52 विद्यार्थिनींना बुधवारी शिवसेना भवन येथे प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. स्वर्गीय सौ. मीनाताई ठाकरे स्मृती स्मारक समितीच्या अध्यक्षा रश्मी ठाकरे यांच्या हस्ते विद्यार्थिनींना प्रमाणपत्र देण्यात आले. विशेष म्हणजे, कोर्स पूर्ण होताच सर्वच्या सर्व विद्यार्थिनींना चांगल्या पगाराची नोकरी मिळाली आहे.
मुलींना व्यावसायिक प्रशिक्षण देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहता यावे यासाठी स्वर्गीय सौ. मीनाताई ठाकरे स्मृती स्मारक समिती संचालित प्रभादेवी येथील स्वर्गीय मीनाताई ठाकरे कौशशल्य निकेतन आणि वांद्रे येथील फादर अॅग्नेल टेक्निकल इन्स्टिटय़ूट यांच्यातर्फे सहा महिन्यांचा ब्युटिशियन आणि नार्ंसग असिस्टंट कोर्स सुरू करण्यात आला होता. पहिल्या बॅचला विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सहा महिन्यांचा कोर्स पूर्ण होताच या विद्यार्थिनींनी एक महिन्याची इंटर्नशिप पूर्ण केली आणि त्यांना चांगल्या पगाराची नोकरी मिळाली.
कोर्समध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थिनींना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यासाठी बुधवारी शिवसेना भवन येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात स्वर्गीय मीनाताई ठाकरे काwशल्य निकेतनच्या वाटचालीबाबत शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी प्रास्ताविक केले. शिवसेना उपनेते नितीन बानगुडे पाटील यांनी यावेळी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. विभागप्रमुख-आमदार महेश सावंत, विभाग संघटक श्रद्धा जाधव, स्वर्गीय सौ. मीनाताई ठाकरे स्मृती स्मारक समितीचे विश्वस्त विजय कदम, उपसचिव प्रवीण पंडित, दै. सामनाचे संचालक विवेक कदम, फादर अॅग्नेल टेक्निकल इन्स्टिटय़ूटचे संचालक फादर व्हेलेरियन डिसुझा, सीनियर मॅनेजर जयवंत राऊत व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भास्कर देसले यांनी केले.
























































