
डबघाईला आलेली ब्रिटनची अर्थव्यवस्था सावण्यासाठी पंतप्रधान ऋषी सुनक यांनी करविषयक कठोर निर्णय घेतले. मात्र, स्वपक्षाच्या म्हणजे हुजूर पक्षाच्या 40 खासदारांनी बंडाचा पवित्रा घेतला आहे. करकपात करावी असा या खासदारांचा दबाव आहे. दरम्यान, पंतप्रधानपदाची सुत्रे हाती घेऊन सुनक यांना अवघे सहा आठवडे झाले असताना खासदारांनी बंडाचे निशान फडकविल्यामुळे ब्रिटनची वाटचाल पुन्हा राजकीय अस्थिरतेच्या दिशेने सुरू झाली आहे.
पंतप्रधानपदाची सुत्रे घेतानाच ऋषी सुनक यांनी अर्थव्यवस्थेला सावण्यासाठी आपले सरकार कठोर निर्णय घेईन. आर्थिक स्थैर्य आणि जनतेमध्ये आत्मविश्वास हे दोन गोष्टी सरकारच्या अजेंडाच्या पेंद्रस्थानी असतील, असे म्हटले होते. त्यांनी हुजूर पक्षाच्या खासदारांना याची कल्पना दिली होती. मात्र, 40 खासदारांनी एकत्र येत अर्थमंत्री जर्मे हंट यांना एक पत्र लिहीत करकपातीची मागणी केली आहे.
























































