
कोरोना रुग्णांमध्ये लक्षणेही दिसत नाहीत. सध्या कोरोना रुग्णांचे निदान करण्यासाठी आरटी-पीसीआर टेस्ट, अँटिजेन टेस्ट केली जाते. पण आता तुमच्या आजूबाजूला एखादा कोरोना रुग्ण असेल तर अलार्म वाजून तुम्हाला तो धोक्याची सूचना देणार आहे. ब्रिटनमधील शास्त्रज्ञांनी सीलिंक माऊंटेड कोविड अलार्म तयार केला आहे.
एखाद्याला ताप आला, कुणी खोकत असेल तर त्याला कोरोना तर झाला नाही अशी भीती आपल्या मनात निर्माण होते. ब्रिटनमधील शास्त्र्ाज्ञांनी असा एक अलार्म तयार केला आहे जो आपल्या आजूबाजूला किंवा रूममध्ये कोरोनाबाधित व्यक्ती असल्यास त्याबद्दल 15 मिनिटांत माहिती देईल. लंडन स्कूल ऑफ हायजीन अॅण्ड ट्रॉपिकल मेडिसिन आणि डरहॅम युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी यावर प्राथमिक संशोधन नुकतेच पूर्ण केले आहे.
कोरोना अलार्म या उपकरणाच्या चाचणीचे निकाल सुरुवातीच्या टप्प्यात आहेत. त्यांचे हे संशोधन वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले असून त्याची समीक्षा करणे अद्याप बाकी आहे. आरटी–पीसीआर आणि अँटिजेन टेस्टच्या तुलनेत हे उपकरण अधिक प्रभावीपणे कोरोनाबाधितांची माहिती देईल, असा दावा संशोधकांकडून करण्यात येत आहे.
- कोरोनाबाधितांबद्दल माहिती देणारे हे उपकरण येत्या काळात विमानातील केबिन, शाळा, केअर सेंटर आणि घर तसेच कार्यालयांमध्ये स्क्रिनिंगसाठी बसवता येईल. या उपकरणाचा आकार ‘स्मोक अलार्म’ एवढा आहे.
- फर्म रोबो सायंटिफिकने तयार केलेला हा सेन्सर त्वचेद्वारे निर्मित रसायने शोधून कोरोनाबाधित व्यक्ती ओळखू शकतो. हा सेन्सर कोरोना विषाणूमुळे संक्रमित लोकांच्या श्वासामध्ये असलेल्या रसायनांचे परीक्षण करून निकाल देतो.
- हा सेन्सर मानवी नाकाद्वारे ओळखता येणाऱया सूक्ष्म वासालाही ओळखतो. कोविड अलार्म शोधणाऱया या टीमच्या एका संशोधनात दिलेल्या माहितीनुसार, हा सूक्ष्म वास केवळ श्वान ओळखू शकतात, मात्र हा अलार्म त्यापेक्षा जास्त अचूक माहिती देऊ शकेल.
- हा सेन्सर कोरोनाबाधित व्यक्तींना शोधू शकतो. बाधिताला कोरोनाची कोणतीही लक्षणे नसली तरी हा सेन्सर अचूक शोध घेऊ शकतो.





























































