घरगुती वादातून भावाचा बहीणीवर चाकू हल्ला; आरोपी अटकेत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

घरगुती वादातून भावाने सख्या बहिणीवर चाकूने वार करून खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी मुंढवा पोलिसांनी भावाला अटक केली आहे. धिरज दिलीप नवले (वय 30,रा. झेड कॉर्नर मांजरी, हडपसर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत 33 वर्षांच्या महिलेने तक्रार दाखल केली आहे. ही घटना घोरपडी परिसरात 4 जुलै रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास घडली. घरगुती कारण व आईला सतत भेटण्याच्या कारणातून हा प्रकार घडल्याचे पोलिसांनी सांगितले.

तक्रारदार महिला व आरोपी बहीण-भाऊ आहेत. तक्रारदार आईला बस स्टॉपला सोडून घरी आल्या होत्या. त्यावेळी आरोपी आजीसोबत घरी आला होता. त्यावेळी त्याने आईला सारखी का भेटते व इतर घरगुती कारणातून तक्रारदार महिलेसोबत वाद सुरू केला. गळा दाबून तुला खल्लास करतो, अशी धमकी देत किचनमधील चाकूने महिलेच्या मानेवर वार करून जबर जखमी केले. त्यानंतर महिलेने पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली होती. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक पोटे करीत आहेत.