… मुख्यमंत्र्यांनी आधीच कळवले असते तर 40 जवानांचे प्राण वाचले असते

सामना ऑनलाईन । बंगळुरू

कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांना पुलवामा हल्ल्यावर वादग्रस्त विधान करणे चांगलच महागात पडलं आहे. पुलवामा हल्ल्याची पूर्वसूचना आपल्याला दोन वर्षापूर्वीच मिळाली होती. असा दावा करणाऱ्या कुमारस्वामी यांनी जर वेळीच ही माहीती पोलीस व राष्ट्रपतींना दिली असती तर त्या 40 जवानांचे मरण टाळता आले असते. असे म्हणत कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री व भाजपचे,ज्येष्ठ नेते येडीयुरप्पा यांनी मुख्यमंत्री कुमारस्वामीं यांना लक्ष्य केलं आहे.

जम्मू-कश्मीर येथील पुलवामामध्ये १४ फेब्रुवारी रोजी सीआरपीफच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. यात ४० हून अधिक जवान शहीद झाले होते. जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्विकारली होती. त्यानंतर देशभरात या हल्ल्याचे तीव्र पडसाद उमटले होते. पाकिस्तानला जशास तसे उत्तर दया अशी मागणी देशातील जनतेने केली होती. याचदरम्यान कर्नाटकातील चिक्कांगलुरू जिल्ह्यात एका सभेमध्ये कुमारस्वामी यांनी आपल्याला एका माजी लष्करी अधिकाऱ्याने 2 वर्षापूर्वींच असा हल्ला होणार असल्याची माहिती दिली होती. असे विधान केले होते. त्यावरून सगळीकडे खळबळ उडाली होती. कुमारस्वामी यांच्या याच वक्तव्यावरून विरोधकांनी त्यांना घेरण्याचा प्रयत्नही केला होता. कुमारस्वामी यांनी देशहित लक्षात न ठेवता देशाच्या सुरक्षिततेचा अपमान केला. यामुळे त्यांच्यावर कायेदशीर कारवाई करावी अशी मागणी कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री व भाजपचे नेते जगदीश शेट्टर यांनी केली होती.

आता याच मुद्दयावरून कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री व भाजपचे,ज्येष्ठ नेते येडीयुरप्पा यांनीही कुमारस्वामींना लक्ष केले आहे. जर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना दोन वर्षापूर्वीच या हल्ल्याची माहिती मिळाली होती. मग ती त्यांनी पोलीस किंवा राष्ठ्रपतींना का नाही दिली. त्यामुळे आपल्या 40 जवानांचे प्राण तरी वाचवता आले असते. असे येडीयुरप्पा यांनी एएनआयला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.