बांगलादेशींचा घुसखोरीचा प्रयत्न बीएसएफने उधळला

आसाममधून बांगलादेशी घुसखोरांचा एक मोठा गट घुसखोरी करत असल्याचा प्रयत्न सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) हाणून पाडला. पहाटेच्या सुमारास बांगलादेशी घुसखोर दक्षिण सलमारा मानकाचार जिह्यातून बेकायदेशीरपणे हिंदुस्थानात प्रवेश करताना आढळले. सीमेवर तैनात असलेल्या बीएसएफ जवानांनी बांगलादेशी नागरिकांच्या संशयास्पद हालचाली ओळखून घुसखोरीचा प्रयत्न यशस्वीपणे हाणून पाडला, असे बीएसएफच्या प्रवक्त्याने सांगितले.