हिराबाई हांडे यांचे निधन 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वृत्तपत्र वितरण क्षेत्रातील दिग्गज स्व. बुवासाहेब दांगट यांच्या ज्येष्ठ कन्या गं. भा. हिराबाई हांडे (72) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने मुंबईत निधन झाले.

दांगट न्यूजपेपर एजन्सीचे प्रसिद्ध वृत्तपत्र वितरक बाजीराव दांगट, जुन्नरचे माजी आमदार बाळासाहेब दांगट, ‘कृषिभूषण’ शंकरराव दांगट आणि गीताराम दांगट यांच्या त्या भगिनी होत. या चार बंधूंसह त्यांच्या पश्चात मंगल नायकोडी, नंदा गाढवे आणि डॉ. अरुणा राव या तीन भगिनी व सुदर्शन हांडे, जयंत हांडे व प्रमोद हांडे ही तीन मुले, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. त्यांचा दशक्रिया विधी रविवार, 25 डिसेंबरला उंब्रज नं. 2, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे येथे सकाळी 8 वाजता होणार आहे.