Budget च्या दिवशी पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी, आता वाचणार 40 रुपये

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
pune

आज देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यात आला. त्यामुळे प्रत्येक जण आपल्याला कुठे फायदा होणार आणि कुठे तोटा होणार हे शोधत आहेत. आम्ही देत असलेली बातमी केंद्रीय अर्थसंकल्पाशी संबंधित नसली तरी पुणेकरांच्या फायद्याची आहे. थोडी फार नाही तर प्रत्येकी 40 रुपयांची बचत करणारी आहे.

राज्यात कोरोना परिस्थिती नियंत्रणात येत आहे. रुग्णसंख्याही घटत असल्याने निर्बंधांमध्ये शिथलता देण्यात येत आहे. पुणे रेल्वे स्थानकात जाणाऱ्या प्रवाशांसाठी ही बातमी महत्त्वाची आहे. पुणे रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म तिकिटांची विक्री सामान्यदराने पुन्हा सुरू झाली. 1 फेब्रुवारीपासून (आजपासून) प्लॅटफॉर्म तिकीट प्रति व्यक्ती 10 रुपये या दराने उपलब्ध होईल. #COVID19 साथरोगाच्या काळात रेल्वे स्थानकावर होणारी अनावश्यक गर्दी रोखण्यासाठी यापूर्वी तिकिटाचा दर 50 रुपये करण्यात आला होता.