
सामना प्रतिनिधी । संभाजीनगर
बेगमपुरा परिसरातील थत्ते हौदाजवळील मोडकळीस आलेली तीन मजली इमारती कोसळल्याची घटना आज शुकवारी पहाटे ५.३० वाजता घडली. या इमरातीमध्ये राहणारी पाच ही कुटुंब सुखरूप असल्याची माहिती देण्यात आली.
बेगमपुरा येथील ऐतिहासिक थत्ते हौदाजवळ तीन मजली इमारतीमध्ये ५ कुटुंब राहत होती. ही इमारत जुनी असल्याने मोडकळीस आली होती. मोडकळीस आलेल्या या इमारतीचा समोरचा भाग सुरुवातील कोसळला. ही बाब रहिवाशांच्या लक्षात येताच इमारतीतील रहिवाशांनी बाहेर पळ काढला. रहिवासी बाहेर आल्यानंतरच काही वेळातच इमारत कोसळली. यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे.
या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाच्या जवनांनी घटनास्थळी धाव घेतली. कोसळलेल्या इमारतीच्या मातीचा ढिगारा हटविण्याचे काम सुरू आहे.































































