
प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण ६७१ अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी ५२४ अहवाल कोरोना निगेटिव्ह असून १४७ अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील १०१ व रॅपिड टेस्टमधील ४६ अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून २१६ तर रॅपिड टेस्टमधील ३०८ अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे ५२४ अहवाल निगेटिव्ह आहेत.
आज ५७ रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. आजपर्यंत १९८३४ रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत २६२९ कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रुग्णांची एकूण संख्या २६२९ आहे.
आज रोजी ११४२ नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल १९८३४ आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण ३७५२ कोरोनाबाधित रुग्ण असून त्यापैकी २६२९ कोरोनाबाधीत रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रुग्णालयात १०६६ कोरोना बाधीत रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच आजपर्यंत ५७ कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.



























































