
सामना प्रतिनिधी । बुलढाणा
प्रभू श्रीरामचंद्राच्या जन्मभूमी अयोध्यानगरीत महाआरतीचा गजर घुमत असताना शनिवारी बुलढाण्यातही पेठेतील राममंदिरात जिल्हा शिवसेनेच्या वतीने महाआरती करण्यात आली.
रामाचे नाव घेवून सत्तेवर आलेल्या राज्यकर्त्यांना राममंदिराची आठवण करुन देण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘हर हिंदू की यही पुकार पहले मंदिर फिर सरकार’चा नारा दिला आहे. राममंदिर व्हावे ही जनभावना आहे. यासाठी ४ वर्ष ‘मन की बात’ ऐकवणार्या सरकारने आत ‘जन की बात’ ऐकावी असे प्रतिपादन शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत यांनी महाआरती प्रसंगी केले. आज सायंकाळी पार पडलेल्या पेठेतील राममंदिरात महाआरतीला शिवसैनिक, माता-भगिणींसह हिदु बांधवांनी प्रचंड उपस्थिती होती.
यावेळी शिवसेना पदाधिकारी डॉ. मधुसुदन सावळे, गजेंद्र दांदडे, विजय जायभाये, लखन गाडेकर, बाळासाहेब नारखेडे, बाळासाहेब बारोटे, वैशाली ठाकरे, कैलास माळी, उमेश कापुरे, रमेश गायकवाड, आशिष जाधव, दीपक सोनुने, अशोक गव्हाणे, राजु मुळे, हेमंत खेडेकर, संजय ठाकरे, गोपाल डिके, कुणाल गायकवाड, आकाश टेकाळे, सचिन परांडे, उत्कर्ष डाफणे, किरण देशपांडे, ज्ञानेश्वर खांडवे, लक्ष्मण ठाकरे, विजय कल्याणकर, संजय तोटे, भिमराव आडवे, अशोक संतापे, सिता जाधव, प्रभा ठाकूर, मालवीताई, संतोष देशमुख, बंटी ठाकूर, गणेश उगले, पप्पु सोनुने, सचिन पवार, अमित सोनुने, वैभव परांजपे, समिर काळे, गौरव देशमुख, अभिजीत सुरडकर यांचेसह अनेकांची उपस्थिती होती.































































