
मालाडमध्ये चोरट्याने महिलेच्या घरी घरफोडी करून साडेबारा लाख रुपयांचा ऐवज पळवल्याची घटना घडली. गेल्या आठवड्यात तक्रारदार या पतीसोबत वापी येथे गेल्या होत्या. दोन दिवसांनी त्या पुन्हा घरी आल्या असता त्यांच्या घराचे दरवाजे उघडले होते. चोरट्याने घरातून सोन्याचे मंगळसूत्र, हिऱ्याचे नेकलेस, सोन्याचे पेंडंट, चेन, आठ महागडी घड्याळे, हार्डडिस्क, प्रोजेक्टर, दोन लाख रुपये रोक्कड असा ऐवज घेऊन पळ काढला. याप्रकरणी महिलेने बांगूरनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. बांगूरनगर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याचा समांतर तपास क्राइम ब्रँचदेखील करत आहे.
























































