माझगावच्या बुर्‍हानी कॉलेजला युवासेनेचा दणका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

कमी हजेरीचे कारण देत विद्यार्थ्यांना परीक्षेस बसू न देणार्‍या माझगावच्या बुर्‍हानी कॉलेज प्रशासनाला युवासेनेने चांगलाच दणका दिला आहे. मुंबई विद्यापीठाला अंधारात ठेवून प्रथम आणि द्वितीय वर्ष बी.कॉम आणि बीएमएमच्या तब्बल 350 विद्यार्थ्यांना कॉलेज प्रशासनाने आजपासून सुरू झालेल्या परीक्षेपासून दूर ठेवले होते. मात्र याविरोधात युवासेनेने आवाज उठवताच विद्यार्थ्यांचा परीक्षेला बसण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

बुर्‍हानी कॉलेज हे अल्पसंख्याक दर्जाचे कॉलेज असून गेल्या काही वर्षांपासून या कॉलेजमध्ये अनागोंदी कारभार सुरू आहे. यंदाही ऐन परीक्षेच्या तोंडावर कमी हजेरीचे कारण देत विद्यार्थ्यांना परीक्षेस बसण्याची परवानगी नाकारण्यात आली. काही विद्यार्थ्यांनी याविषयी युवासेनेकडे तक्रार केली. या तक्रारीची दखल घेत युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार सिनेट सदस्य राजन कोळंबेकर, प्रदीप साकंत क निखिल जाधक यांनी मुंबई विद्यापीठात कॉलेजविरोधात तक्रार केली.

युवासेनेने विद्यापीठाकडे सतत पाठपुरावा करून सत्यशोधक समिती स्थापन करून घेतली. या समितीमधील प्राचार्य डॉ. अजय भामरे, सिनेट सदस्य राजन कोळंबेकर, मिलिंद साटम यांनी आज कॉलेजला भेट दिली असता सदर समितीच्या दट्ट्यामुळे या सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्याची परवानगी देण्यात आली. यावेळी शाखाप्रमुख निंगप्पा चलवादी, महिला शाखा संघटक अश्विनी खटावकर, विभाग युवा अधिकारी स्कप्नील बागवे, युवासेना पदाधिकारी सागर जाधव, अरबाझ खान, मोहमद रफी, सादिक मुजावर, समी कुरेशी, नंदिनी चौरसिया आदी उपस्थित होते.