मास्क घालायला सांगितला म्हणून कंडक्टरला मारहाण

प्रातिनिधिक फोटो

कोरोनापासून बचावासाठी मास्क घालणे आवश्यक असताना एका प्रवाशाला मास्क न घातल्याबद्दल जाब विचारल्याने त्याने बेस्टच्या कंडक्टरलाच मारहाण केल्याचा प्रकार भार्इंदर ते मरोळ आगार मार्गावरील बस सेवेत आज घडला.

घराबाहेर पडल्यानंतर मास्क वापरणे बंधनकारक असूनही काही जण बिनधास्त नियमांचे उल्लंघन करीत असतात. बस मार्ग क्र. 706 भार्इंदर ते मरोळ आगार मार्गावर धावणाNया बस फेरीत गुरुवारी एक प्रवासी चढला. त्याने मास्क न घातल्याने कंडक्टर साईनाथ खरपडे यांनी त्यास तशी विनंती केली. त्यावेळी आपणाला कोरोना झालेला नसल्याचे सांगत या प्रवाशाने कंडक्टरलाच बोल लावला. त्यावरून कंडक्टरशी वादावादी केल्यानंतर कांदिवलीतील एका थांब्यावर उतरत असताना या प्रवाशाने कंडक्टरला मारहाण केली आणि पळ काढला. त्यानंतर कंडक्टरने त्याची तक्रार पोलीस ठाण्यात नोंदविली.

आपली प्रतिक्रिया द्या