तुमसर आगारातील चालकाचा आत्महत्येचा प्रयत्न

431

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या तुमसर आगारातील चालक संजय वैद्य यांनी मानसिक ताणतणावामुळे मंगळवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास किटनाशक पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केले. त्यांना भंडारा येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.या घटनेमुळे कर्मचाऱ्यांनी एकजूट दाखवत बस्थानक परिसरात बस उभ्या करून अन्याय झालेल्या चालक संजय वैद्य याचा बाजूने समर्थन दर्शविले.

कर्मचाऱ्यांनी बससेवा थांबवल्याने प्रवासी व विद्यार्थ्यांचे हाल झाले. या घटनेची दखल घेत परिवहन महामंडळाचे अधिकारी नागुलकर भंडाऱ्याहून तुमसर आगारात आले. घटनेची माहिती घेऊन याप्रकरणी आगर व्यवस्थापक किंवा इतर अधिकारी दोषी असल्यास त्यांच्यावर निश्चितच कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बिसेन व त्यांचे पोलीस कर्मचारी उपस्थित होते. या आश्वासनानंतर चालक व वाहक कर्मचाऱ्यांनी सायंकाळी बस सेवा सुरू केली.

आपली प्रतिक्रिया द्या