
पुण्यात गाडीची काच फोडून चोरट्यांनी व्यावसायिकाच्या लॅपटॉपसह कागदपत्रे चोरून नेल्याची घटना घडली आहे. 30 जुलैला सकाळी साडेदहाच्या सुमारास स्वारगेट भागातील आयकर भवन कार्यालयासमोर गाडी उभी असताना ही घटना घडली आहे. याप्रकरणी अच्युत कोठारी (वय 42, रा. भूमकर चौक, ताथवडे) यांनी खडक पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
कोठारी हे पेशाने व्यावसायिक असून 30 जुलैला सकाळी दहाच्या सुमारास ते कामानिमित्त स्वारगेट परिसरात आले होते. त्यावेळी त्यांनी त्यांची गाडी आयकर भवन कार्यालयासमोर उभी केली होती. यावेळी चोरट्यांनी गाडीची काच फोडून त्यातील 15 हजारांचा लॅपटॉप आणि कागदपत्रे असा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी पोलीस हवालदार ए. जी. पाटील तपास करत आहेत. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी जंगली महाराज रस्त्यावर देखील मोटार चालक तरुणीचे लक्ष विचलित करुन चोरट्यांनी सोन्याचे कडे, कागदपत्रे असा ऐवज चोरला होता.

























































