सार्वजनिक ठिकाणी तलवारीने वाढदिवसाचा केक कापला दोन तलवारी जप्त, 13 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिरुरअनंतपाळ तालूक्यातील मौजे हालकी येथे रस्त्यावर तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. याची माहिती पोलिसांनी मिळाल्यानंतर त्यांनी दखल घेऊन दोन तलवारी जप्त केल्या आहेत तर 13 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिरुर अनंतपाळ तालूक्यातील मौजे हालकी येथे 23 फेब्रुवारी रोजी रस्त्यावर तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला होता. हालकी येथील मनोज नारायणसिंह गहिरवार याचा वाढदिवस त्याने आणि त्याच्या मित्रांनी रस्त्यावर तलवारीने केक कापून साजरा केलेला होता. पोलीसांना याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस पथकाने मनोज नारायणसिंह गहिरवार याच्या घरी छापा टाकला. यावेळी मनोज गहिरवार याच्या घरातून दोन तलवारी जप्त करण्यात आल्या. त्याच्यासोबत प्रकाश गोरोबा कोरे, सुमेरसिंह अनंतरामसिंह गहिरवार, रामसिंह उदयसिंह गहिरवार, प्रवीण उर्फ पवन प्रकाश कोरे, किशोर तुकाराम सुरवसे, गणेश रमेश सोनवणे, सतीश सोनेराव कोरे, अमोल नागोराव इंगळे, पांचाळ रतन गोवर्धन, प्रदिप दगडू बनसोडे, विकास सुरवसे,महेश हरिश्चंद्र सारंगे सर्वजण रा.हालकी ता. शिरुरअनंतपाळ हे होते. या सर्वांविरुध्द पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस निरीक्षक बी.पी.कदम, उपनिरीक्षक स्वामी, कर्मचारी पन्हाळे, तपघाले, तुमकुटे, सौदागर, वासुदेव, मोरे, साठे, चामे यांनी ही कारवाई केली. शिरुरअनंतपाळ पोलीस ठाण्यात या प्रकरणी 13 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.