#ICCWorldCup वर्ल्डकपमध्ये फक्त 36 धावांत ‘या’ संघाचा खुर्दा उडाला

61

सामना ऑनलाईन । मुंबई

आयसीसी क्रिकेट विश्वचषकाला अवघे काही दिवस बाकी आहेत. इंग्लंडमध्ये रंगणाऱ्या 12 व्या विश्वचषकामध्ये 10 संघ सहभागी होणार आहे. क्रिकेटच्या या कुंभमेळ्यामध्ये प्रत्येक संघ मोठी धावसंख्या रचण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु क्रिकेट वर्ल्डकपच्या इतिहासामध्ये पाहिले तर एकाच संघाच्या नावावर सर्वात कमी धावसंख्येची नोंद आहे.

क्रिकेट विश्वचषकाच्या इतिहासामध्ये सर्वात कमी धावसंख्येचा लाजीरवाणा विक्रम कॅनडा या संघाच्या नावावर आहे. कॅनडाने हा नकोसा विक्रम 2003 च्या विश्वचषकामध्ये श्रीलंकेविरुद्ध नोंदवला होता. वर्ल्डकपमधील 18 व्या सामन्यात श्रीलंकेने कॅनडाचा अवघ्या 36 धावांमध्ये खुर्दा उडवला होता. कॅनडाच्या एकाही फलंदाजाला दुहेरी संख्या गाठता आली नव्हती. त्यांचे पाच फलंदाज तर शून्यावर बाद झाले. या सामन्यात पी. निसांकाने 7 षटकात फक्त 12 धावा देऊन 4 बळी घेतले, होते तर चामिंडा वासने 3 बळी घेतले. सी फर्नांडोला 2 तर मुरलीधरनला एक बळी मिळाला होता. श्रीलंकेने हे आव्हान 4.4 षटकात एका गड्याच्या मोबदल्यात पार करून 9 विकेट्सने विजय मिळवला होता.

slvcd

1979 वर्ल्डकपमध्येही कॅनडाचा संघ इंग्लंडविरुद्ध अवघ्या 45 धावांमध्ये गारद झाला होता. तसेच 2003 ला नामेबियाचा संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध 45 धावांमध्ये बाद झाला होता. विश्वचषकामध्ये सर्वात धावसंख्या कॅनडाने दोन वेळा नोंदवली आहे.

वर्ल्डकपमध्ये सर्वात कमी धावसंख्या नोंदवणारे 10 संघ

कॅनडा – 36
कॅनडा – 45
नामेबिया – 45
बांगलादेश – 58
स्कॉटलंड – 68
केनिया – 69
पाकिस्तान – 74
आयर्लंड – 77
बांगलादेश – 78
बर्मुडा – 78

आपली प्रतिक्रिया द्या