नालेसफाईचे 64 कोटींचे प्रस्ताव मंजूर, स्थायी समितीची मान्यता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई महापालिकेने फेब्रुवारीपर्यंत मोठय़ा नाल्यांचे प्रस्ताव मंजूर करून कामाला सुरुवात केली असताना आता पावसाळ्याच्या तोंडावर पश्चिम उपनगरातील छोटय़ा नाल्यांचे 51 कोटी तर पूर्व उपनगरातील घाटकोपर आणि भांडुपमधील छोटय़ा नाल्यांच्या सफाईचे 13 कोटी असे एकूण 64 कोटींचे प्रस्ताव स्थायी समितीने मंजूर केलेत. त्यामुळे मुंबईत वेळेत नालेसफाई होणार आहे.

मुंबईमध्ये वाढत्या कोरोनाला रोखण्यासाठी राज्य आणि पालिकेने लागू केलेल्या कडक निर्बंधांमुळे खबरदारीचा उपाय म्हणून पालिका मुख्यालयात महासभा, गटनेता बैठका होत नव्हत्या. मात्र, स्थायी समितीची बैठक आणि विविध समितीच्या बैठका या सामाजिक अंतर राखून पालिका सभागृहात घेतल्या जात होत्या.

मात्र, वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, स्थायी समितीची बैठक ऑनलाइन घेण्याचे पालिकेने ठरवले. याविरोधात भाजपने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, न्यायालयाच्या आदेशाने भाजपला चपराक देत बैठक ऑनलाइनच घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार पालिका मुख्यालयात ही बैठक पार पडली.

नालेसफाईचा आढावा घेणार

मुंबईत पाकसाळ्यापूर्की होणाऱया नालेसफाईची पाहणी लवकरच महापौर किशोरी पेडणेकर क स्थायी समिती अध्यक्ष यशकंत जाधक पालिका अधिकाऱयांसोबत करणार आहेत. नालेसफाईची कामे कशी सुरू आहेत, किती टक्के नालेसफाई झाली आहे, याची माहिती घेतली जाणार आहे. त्याचबरोबर रस्ते दुरुस्तीच्या कामांचीही पाहणी केली जाणार आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने झालेल्या बैठकीचे रेकॉर्डिंग करण्याचे आदेश याचिकाकर्त्या भाजप सदस्यांना दिले होते. मात्र, बैठकीकेळी याचे रेकॉर्डिंग होत नाही, असा आरोप करत भाजप सदस्यांनी बैठकीत नाहक गोंधळ घातला. रेकॉर्डिंगची जबाबदारी भाजप सदस्यांची होती. मात्र, त्यांच्याकडून शिवसेनेची नाहक बदनामी करण्यात येत आहे.
– यशवंत जाधव, अध्यक्ष, स्थायी समिती