केअर टेकरने दागिने चोरले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

पतीच्या सुश्रुसेसाठी ठेवलेल्या केअर टेकरची नियत फिरली. 81 वर्षीय वृद्धेच्या असहाय्यतेचा गैरफायदा उचलत त्याने वृद्धेचा गळा आवळला मग त्यांच्या गळय़ातील सोन्याची चेन व सोन्याच्या बांगडय़ा काढून पोबारा केला. याप्रकरणी तक्रार दाखल होताच जुहू पोलिसांनी आरोपी अंकित पाटील (35) याला अटक केली.