जमावबंदी आदेशाचा भंग करुन जनावरांचा बाजार भरवला; 3 जणांवर गुन्हा दाखल

366

जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदी आदेशाचा भंग करुन जनावरांचा बाजार भरवल्याप्रकरणी बाजार समितीचे माजी सभापती व विद्यमान संचालक नानासाहेब पवार, टाकळीभानच्या सरपंच रुपाली धुमाळ, पवार आणि इतर 3 जणांवर श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक विशाल रामराव हापसे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टाकळीभान येथील खिर्डी रोडवरील आठवडे बाजारच्या जागेवर रविवारी सकाळी 10.30 ते 12.30 या वेळेत बाजार भरवण्यात आला होता. सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई असताना जनावरांचा अवैध बाजार भरवण्यात आला. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सहा व्यक्तींविरोधात श्रीरामपूर तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. टाकळीभान अद्याप कोरोनामुक्त असल्याने जनावरांचा बाजार भरवल्याने कोरोनाचा फैलाव होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. तसेच बाजार भरवणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचीही मागणी करण्यात आली होती.

आपली प्रतिक्रिया द्या