
जमिनीच्या सपाटीकरणाची परवानगी मिळवून देण्यासाठी 70 हजारांची लाच मागितल्याप्रकरणी हवेली तहसील कार्यालयातील अव्वल कारकून आणि खासगी व्यक्तीविरूद्ध स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बालाजी सुधाकर चिद्दरवार (वय 50, अव्वल कारकून, तहसील कार्याल हवेली), आणि संजय महादेव जाधव (वय 28) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
तक्रारदार यांच्या वडिलांच्या नावे असलेल्या जमिनीच्या सपटीकरणाची परवानगी तहसीलदार कार्यालयाकडून मिळवून देतो, असे सांगून संजय जाधव याने 70 हजारांची मागणी केली. याप्रकरणी तक्रारदारांनी लाचलुपत विभागाकडे तक्रार दाखल केली होती. दाखल तक्रारीची 26 मार्च ते 28 मे या कालावधीत पडताळणी केली असता, जाधवने लाच मागितली असून त्याला कारकून चिद्दरवार याने प्रोत्साहन दिल्याचे उघडकीस आले. मंगळवारी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक सुनिल क्षीरसागर तपास करीत आहेत.
































































