महिलेवर अत्याचाराच्या आरोपखाली शिक्षकावर गुन्हा

35
प्रातिनिधिक फोटो

सामना प्रतिनिधी । नांदेड

माहूर तालुक्यातील मौजे वानोळा येथील आदिवासी समाजातील एका महिलेच्या अज्ञानीपणा व गरिबीचा गैरफायदा घेऊन आदिवासी महिलेवर एक वर्षापासून अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी शिक्षक दत्ता सोमला राठोड याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

वानोळा येथील एका विद्यालयातील माध्यमिक शिक्षक दत्ता सोमला राठोड (55) याने महिलेच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप महिलेच्या पतीने केला. त्यामुळे दत्ता राठोडने तिच्या पतीसोबतही वादावादी केली. त्यामुळे महिलेने माहूर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. आरोपी दत्ता सोमला राठोड या शिक्षकाविरुद्ध पो.स्टे माहूर येथे गु.र.नं. 83/2019 भा.दं.वी. कलम 376(2),(एन), 376(2) (ह), 506, भा.दं.वी व कलम 3(1) (डब्ल्यू), 3 (2) (व्ही) अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी ए.डी.जहारवाल हे करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या