
सिव्हिल सर्व्हिसेसच्या 2019च्या बॅचच्या अधिकारी नुपूर बोरा यांच्या घरावर आसामच्या विशेष दक्षता विभागाने छापा घातला. त्यांच्या दोन घरांतून एक कोटीची रोकड आणि सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. बोरा यांनी हिंदूंच्या जमिनी मुस्लिमांना हस्तांरतरित करून गडगंज नफा कमावल्याचा आरोप आसामचे मुख्यमंत्री हिमांता बिस्वा सरमा यांनी केला आहे.
बोरा यांच्या कार्यपद्धतीवर संशय बळावल्यामुळे गेल्या काही काळापासून त्यांच्यावर पाळत ठेवण्यात आल्याचे हिमंता बिस्वा सरमा यांनी सांगितले. मुख्यमंत्री दक्षता कक्षाने महिला अधिकारी नुपूर बोरा यांच्याशी संबंधित कथित चार ठिकाणी सोमवारी एकाच वेळी छापे टाकले. मुस्लीमबहुल बारपेटा जिह्यात नियुक्ती मिळाली असताना नुपूर बोरा यांनी केलेल्या जमीन हस्तांतर प्रकरणांवर सरकारची करडी नजर होती, असे मुख्यमंत्री म्हणाले.