ब्रेकिंग न्यूज – लष्कराच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत सीडीएस बिपीन रावत यांचा मृत्यू

तामिळनाडूतील कुनूर शहरात लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले आहे. या दुर्घटनेत देशाचे चिफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत व त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांचा मृत्यू झाला आहे. या वृत्ताला पुष्टी देण्यात आली आहे. बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नीसह 13 जणांचे मृतदेह सापडले आहेत.

रावत आणि त्यांच्या पत्नी या हेलिकॉप्टरने प्रवास करत होत्या. खराब वातावरणामुळे हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. या हेलिकॉप्टरमध्ये चौदा जण प्रवास करत होते. घटनास्थळावरून बचाव पथकाने एकूण 13 मृतदेह बाहेर काढले आहेत.

सीडीएस बिपीन रावत यांच्या निधनाने आपण दुःखी झाल्याची प्रतिक्रिया संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी दिली आहे.

“>