
सामना प्रतिनिधी । मुंबई
मोदी सरकारने जम्मू-कश्मीरला विशेष दर्जा देणारे 370 कलम हटवण्याचा निर्णय घेतल्यानंतर देशभरात एकच जल्लोष झाला. मुंबईत ठिकठिकाणी आनंदोत्सव साजरा करण्यात आला. पेढे वाटण्यात आले. फटाके वाजवण्यात आले. भारत माता की जय, वंदे मातरमच्या घोषणांनी मुंबईचा कानाकोपरा दणाणला.
वारकर्यांकडून मोदी, शहांचे अभिनंदन
वारकर्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे अभिनंदन केले.आज आळंदीत जल्लोषाचे वातावरण होते. वारकर्यांमध्ये प्रचंड उत्साह होता. आजच्या ऐतिहासिक निर्णयाबद्दल आळंदीत जेवण देण्यात आले. एकमेकांना पेढे भरवून जल्लोष करण्यात आला.श्री वारकरी प्रबोधन महासमिती, वारकरी महामंडळ, अखिल भारतीय संत समिती, श्री संत सेवा आश्रम या वारकरी संघटनांच्या वतीने आळंदीत मिठाई वाटण्यात आली. वारकर्यांना जेवण देण्यात आले. शाळकरी मुलांसाठीही मिष्ठान्न, जेवणाचा कार्यक्रम ठेवण्यात आला. अशी माहिती श्री वारकरी प्रबोधन महासमितीचे संस्थापक, अध्यक्ष रामेश्वर शास्त्राr महाराज यांनी दिली. आम्हीही या देशाचे नागरिक असून आज देश पूर्ण स्वतंत्र झाला. जम्मू-कश्मीरमधील 370 कलम हटवल्याच्या धाडसी निर्णयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आणि गृहमंत्री अमित शहा यांचे मनापासून आभार अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.
‘भारत माता की जय आणि वंदे मातरम्’ म्हणताना आज एक केगळाच आनंद होतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि गृहमंत्री अमित शाह यांचे अभिनंदन करतो. आज एका अनोख्या स्वातंत्र्याची अनुभूती त्यांनी देशवासीयांना दिली.
– देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
‘माझी मातृभूमी आता खऱया अर्थाने स्वतंत्र झाली आहे. आज खऱया अर्थाने इंडिया एक झाला, अशी भावना निर्माण झाली. जय हिंद’
– परेश रावल, अभिनेता
‘अतिशय धाडसी निर्णय. या निर्णयामुळे भविष्यात सर्वसामान्य कश्मिरींचे आयुष्य बदलेल.’
– गुल पनाग, अभिनेत्री
‘या निर्णयामुळे कश्मीर आणि कश्मीरवासायांची शांततापूर्ण प्रगती होईल, अशी आशा बाळगते.’
– रवीना टंडन, अभिनेत्री
‘कश्मीरवर आता तोडगा निघाला आहे. माझ्या आयुष्यातील आतापर्यंतच्या ही सर्वांत आनंदाची गोष्ट आहे.’
– अनुपम खेर, अभिनेता,
‘हा निर्णय कश्मीरवासीयांना पुढे घेऊन जाणारा आहे. कश्मीरमध्ये गुंतवणूक वाढल्यामुळे स्थानिकांना मोठय़ा प्रमाणात रोजगार निर्माण होणार आहे. – मोहित रैना,अभिनेता
‘देशहिताचा हा निर्णय आहे. मला आशा आहे की, आता आम्ही मोकळय़ा हवेत श्वास घेऊ शकतो.’ – – अशोक पंडित,
कश्मिरी पंडित, चित्रपट निर्माता


























































