दररोज 10-12 भाविक कोरोना पॉझिटिव्ह, दक्षता घ्या – केंद्राचा उत्तराखंडला इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कुंभमेळा काळात कोरोनाचा उद्रेक होण्याचा धोका आहे. कुंभमेळ्यादरम्यान दररोज 10 ते 12 स्थानिक नागरिक आणि 10 ते 20 भाविक कोरोना पॉझिटिव्ह आढळून येत असून त्या पार्श्वभूमीवर केंद्राने उत्तराखंड सरकारला कुंभमेळ्याच्या ठिकाणी कडक कोरोना प्रतिबंध अमलात आणा असा इशारा दिला आहे. उत्तराखंडमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यावर कोरोनाचे सावट गडद होताना दिसत आहे. राष्ट्रीय साथरोग नियंत्रण केंद्राच्या संचालकांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय पथकाने हरिद्वार येथे होणाऱ्या कुंभमेळ्याच्या तयारीचा आढावा घेतला. या आढाव्यानंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कुंभमेळा काळात कोरोनाचा उद्रेक होण्याचा इशारा दिला आहे. देशात कोरोनाची दुसरी लाट आलेली असतानाच्या काळातच कुंभमेळा होत असल्याने केंद्र सरकार सतर्क झाले आहे.