
सामना ऑनलाईन । मुंबई
मुंबईत धावणाऱ्या मध्य रेल्वेची वाहतूक आज सकाळी पुन्हा एकादा उशिराने सुरू होती. सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या लोकल 15 ते 20 उशिराने धावत असल्याने कल्याण, डोंबिवली रेल्वे स्थानकांवर सकाळी प्रचंड गर्दी पाहायला मिळत होती. नेहमीच्याच झालेल्या या त्रासामुळे रेल्वेने प्रवास करणारा मुंबईकर नोकरदारवर्ग हैराण झाल्याचे दिसत होते. दरम्यान, गाड्या उशिराने धावण्याचे कारण मात्र सांगण्यात आले नाही.


























































