
सामना ऑनलाईन । मुंबई
मध्य रेल्वेच्या वाहतुकीला पुन्हा एकदा तांत्रिक बिघाडाचा फटका बसला आहे. शनिवारी सकाळी 11:30 च्या सुमारास मस्जिद बंदर ते भायखळा स्थानकांदरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याने सीएसएमटीकडे जाणाऱ्या म्हणजेच अप जलद मार्गावरील वाहतूक खोळंबली आहे. याचा परिणाम उपनगरीय रेल्वे वाहतुकीसह लांबपल्ल्यांच्या गाड्यांच्या वाहतुकीवर झाल्याचे पाहायला मिळते आहे.
दरम्यान, अप जलद मार्गावरील वाहतूक ही धिम्या मार्गावर वळवण्यात आली असून बिघाड दुरुस्तीचे काम रेल्वे प्रशासनाने हाती घेतले आहे.






























































