
सामना प्रतिनिधी। चाकूर
एका अल्पवयीन मुलीची छेड काढल्याच्या प्रकरणावरून तळणी येथे जमावाने एका तरुणाला बेदम मारहाण केली. यात त्याचा मृत्यू झाला आहे. सागर बालाजी मोमले वय (१७ वर्षे ) असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी चाकूर पोलिसात नऊ आरोपींविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पोलीसांनी अरोपीना अटक केली असून त्यापूर्वी मयताविरोधात विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
सागर याने अल्पवयीन मुलगी कॉलेजहून घराकडे जात असताना तिचा हात पकडला व मोबाईल क्रमांक मागितला. हे कळताच काहीजणांनी तरूणाला हत्यार,काठ्या व लाथाबुक्याने मारहाण केली. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी आकाश बालाजी मोमले यांनी पोलिसात तक्रार दिली आहे. पोलिसांनी गणपती खडके,माधव खडके,आत्माराम राजुरे,रमाकांत राजुरे,राम शेवाळे,तुकाराम खडके,सोमनाथ माने,गोपाळ खडके,नरसिंग आलुरे रा.सर्व तळणी यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात येऊन सर्व अरोपीना अटक करण्यात आले आहे .पुढील तपास पोलीस निरीक्षक रामेश्वर तट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक शैलेश बंकवाड हे करीत आहेत.


































































