चाकुर येथील सीमा सुरक्षा प्रशिक्षण केंद्रात जवानाने स्वतःवर गोळी झाडून केली आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । चाकुर

चाकुर येथील सीमा सुरक्षा प्रशिक्षण दल केंद्रातील एका हत्यारी जवानाने स्वतःवर गोळी झाडून घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारीच्या मध्यरात्री एकच्या सुमारास घडली आहे. तर आत्महत्येचे कारण अद्यापही स्पष्ट नसून जवानाचे प्रेत गावाकडे पाठविण्यात आले आहे.

चाकूर येथील सीमा सुरक्षा सहाय्यक प्रशिक्षण केंद्राच्या संरक्षणासाठी गार्ड असलेल्या लिटलरॉय कमलनाथरॉय याने स्वतःवर गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली. लिटलरॉय कमलनाथरॉय (२७) हा मूळचा रा. छोटो पिंजारझार, पोस्ट गोसाईटहर, जि. कुछबिहार, पश्चिम बंगालचा आहे. कँम्पमध्ये मध्यरात्री गस्तीवर असताना लिटलरॉय यांनी स्वतःजवळील हत्याराने गळ्याजवळ गोळी झाडून आत्महत्या केली. तेथील कर्तव्यावर असलेल्या जवानांनी त्याला कँम्पमधील रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले परंतु डोक्यातून अधिक रक्तस्ञाव झाल्याने त्याची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्याला चाकुर येथील शासकीय ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डाँ.एस.बी.नरवटे यांनी त्याची वैद्यकीय तपासणी करून लिटलरॉय यांना मृत घोषीत केले.