चंद्रभागेतील पुंडलिक मंदिर पाण्यात!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उजनी धरणातून दि. २८ रोजी सकाळी ४० हजार, तर सायंकाळी ६२ हजार क्युसेक, तर वीर धरणातून ५ हजार ६०० क्युसेकचा विसर्ग करण्यात आला आहे. यामुळे भीमा (चंद्रभागा) नदीला पुन्हा पूरसदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या पाण्याने पंढरपूर येथील चंद्रभागेतील पुंडलिक मंदिरासह इतर मंदिरांना पाण्याने वेढा दिला आहे. तर जुना दगडी पूल पाण्याखाली गेला आहे. तसेच भीमा नदीवरील कोल्हापूर पद्धतीचे पंढरपूर, विष्णूपद, मुंढेवाडी, गुरसाळे, कौठाळी, पिराची कुरोली, पुळूज, आव्हे हे आठ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे या बंधाऱ्यांवरून होणारी वाहतूक बंद करण्यात आलेली आहे. याबाबत प्रशासनाकडून नदीकाठच्या लोकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.