विमानात दिवे मालवल्यावर महिलेचा विनयभंग, प्रवाशाला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फोटो प्रातिनिधीक

सामना ऑनलाईन, मुंबई

थाय एअरवेजच्या बँकॉक- मुंबई विमानात शेजारी बसलेल्या महिलेचा विनयभंग करणाऱ्या प्रवाशाला सहार पोलिसांनी मंगळवारी अटक केली. चंद्रहास त्रिपाठी असे आरोपीचे नाव असून तो सेल्स कंपनीत उच्च पदावर काम करतो. तक्रारदार महिला कामानिमित्त थायलंडला गेली होती. तिथून परतताना किमानामध्ये तिच्या बाबतीत हा प्रकार घडला.

बँकॉकच्या विमानतळावरून सोमवारी रात्री विमानाने उड्डाण केल्यानंतर विमानातील दिवे मालवण्यात आले. त्यावेळी आरोपीने अयोग्य पद्धतीने स्पर्श करून विनयभंग केल्याचा आरोप महिलेने केला आहे. चंद्रहास त्रिपाठीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. मंगळवारी सकाळी 6.15 च्या सुमारास विमानाने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर लँडिंग केल्यानंतर सीआयएसएफने आरोपी चंद्राहास त्रिपाठीला ताब्यात घेतले. त्रिपाठी मुंबईहून विमानाने मध्य प्रदेशला जाणार होता, पण त्याआधीच त्याला महिलेच्या तक्रारीकरून अटक करण्यात आली.