
ओडिसा येथून करीमनगरला निघालेल्या कामगारांचे चारचाकी वाहन पलटले. यात एक महिलेचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर वाहनातील इतर 11 जण गंभीर जखमी झाले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले.
ही घटना आज पहाटेला मुल तालुक्यातील आकापूर जवळ घडली. वाहनात करीमनगरला निघालेले ओडिसातील मजूर होते. मृत महिलेचे नाव कळू शकले नाही.































































