चंद्रपूर भरधाव कारने विद्युत खांबाला धडक देत घेतला पेट, एकाचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भरधाव जाणाऱ्या कारने विद्युत खांबाला धडक दिली. त्यानंतर ही गाडी दोन वेळा उलटली व अचानक तिने पेट घेतला. या घटनेत एकाचा मृत्यू झाला. देवी लाल यादव असे मृतकाचे नाव आहे. मृतक छत्तीसगड येथील रहिवाशी असल्याची माहीती आहे.

चंद्रपूर-गडचिरोली मार्गावरील राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालयाच्या बाजूला आज ( गुरूवार ) भरधाव जाणाऱ्या कारने मार्गालगत असलेल्या विद्युत खांबाला धडक दिली.त्यानंतर कारने पेट घेतला.पेट घेतलेल्या कारच्या बाजूलाच एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. या घटनेची माहीती मिळताच सावली पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. पुढील तपास सावली पोलीस करीत आहेत.