चंद्रपूर कोरोना अपडेट; जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 22 वर

783

चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता एकूण 22 झाली आहे. सोमवारी सायंकाळी आणखी एका रुग्णाची त्यामध्ये भर पडली आहे. 23 मे रोजी या महिलेचा स्वॅब नमूना घेण्यात आला होता. जिल्हा आरोग्य अधिकारी राजकुमार गहलोत यांनी दिलेल्या माहितीनुसार मूल तालुक्यातील चिरोली येथील पॉझिटीव्ह रुग्णाच्या संपर्कातीत 26 वर्षीय महिला पॉझिटीव्ह ठरली आहे. चंद्रपूरमध्ये 2 मे ( एक रुग्ण ), 13 मे ( एक रूग्ण) 20 मे ( एकूण 10 रूग्ण ) 23 मे ( एकूण 7 रूग्ण ) 24 मे ( एकूण रूग्ण 2 ) आणि 25 मे ( एकूण रूग्ण एक ) अशा प्रकारे जिल्हयातील रुग्ण 22 झाले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या