
10 वर्षापूर्वी सोयाबिनचे उभे पीक उद्धवस्त करणाऱ्या लष्करी अळीचा प्रादुर्भाव चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यात दिसून येत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण दिसून येत आहे. शेतीच्या उभ्या पिकांवर,लष्करी अडी, उंट अळी, किटक आणि इतर रोगांच्या प्रादुर्भावामुळे पिकांचे मोठे नुकसान होते.
10 वर्षापूर्वी भद्रावती आणि वरोरा तालुक्यात लष्करी अळीने थैमान घातले होते. या अळीच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांचे सोयाबीनचे उभे पीक पूर्णतः उद्धवस्त झाले होते. त्याची पुनरावृत्ती यंदाही दिसून येत आहे.
चंद्रपुरात 10 वर्षापूर्वी भद्रावती आणि वरोरा तालुक्यात लष्करी अळीने थैमान घातले होते. या अळीच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांचे सोयाबीनचे उभे पीक पूर्णतः उद्धवस्त झाले होते. त्याची पुनरावृत्ती यंदाही दिसून येत आहे. pic.twitter.com/IlOpARi7JN
— Saamana (@SaamanaOnline) August 31, 2021
भद्रावती तालुक्यातील वाघेडा, जेना, पिल, धानोली, धामणी, नंदोरी आणि टाकळी या गावातील हजारो हेक्टर सोयाबीनच्या पिकांवर ही लष्करी अळी आढळून आली आहेत. ह्या अळीचा प्रादुर्भाव इतका भयानक आहे. की, एका रात्रीतून शेकडो हेक्टर उभे पीक ही अळी नष्ट करते. सध्या पानांची चाळणी झाली असून शेंगाही गळून पळल्या आहेत. त्यामुळे या अळीचा आधीचा प्रादुर्भाव पाहता शेतकरी वर्गात चिंतेचे सावट निर्माण झाले आहेत.



























































