गडचिरोली – घातपाताचा प्रयत्न उधळला, 15 किलो स्फोटके जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पोलिसांचा घातपात करण्याच्या उद्देशाने नक्षल्यांनी जमिनीत पुरुन ठेवलेली 15 किलो स्फोटके हुडकून काढून पोलिसांनी घातपाताचा कट उधळून लावला. गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील लाहेरी-धोडराज मार्गावर ही स्फोटके पुरुन ठेवण्यात आली होती.

सध्या नक्षल्यवाद्यांचा पीएलजीए सप्ताह सुरु असून, ते हिंसक कारवाया करीत आहेत. त्यावर आळा घालण्यासाठी पोलिस मोठ्या प्रमाणावर नक्षलविरोधी अभियान राबवीत आहेत. असेच अभियान राबवीत असताना मंगळवारी पोलिसांना लाहेरी-धोडराज मार्गावर 15 किलो वजनाचे क्लेमोर माईन जमिनीत पुरुन ठेवल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर बॉम्ब शोधक व नाशक पथकास पाचारण करण्यात आले. या पथकाच्या जवानांनी शिताफीने क्लेमोर माईन बाहेर काढून ते निकामी केले. यामुळे मोठा अनर्थ टळला.