Video – चंद्रपुरात पुन्हा पावसाची जोरदार हजेरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आज शहरात सकाळपासून पावसाला सुरुवात झाली. रिमझिम पाऊस पडतोय. मात्र आता दुपारच्या सुमारास एक वेगळाच नजारा लोकांना अनुभवायला मिळाला. भरदुपारी काळोख पडला. ढगांनी एकच गर्दी केल्याने वातावरण अंधारून आले. त्यामुळे संध्यारात्र झाली की काय, असा भास सगळ्यांना झाला. वाहनेही लाईट सुरू करून रस्त्यावरून धावू लागली. अशाप्रकारचा वेगळा अनुभव चंद्रपूरकर पहिल्यांदाच घेत आहेत. वातावरण बघता मुसळधार पावसाचे वाटत असले पाऊस मात्र रिमझिम आहे.