
कमी बजेट असल्याचे सांगत आपल्या लाडक्या बहिणींना उन्हात बसवू नका, माझ्याकडे चिक्कार पैसा आहे. तुम्ही खर्चाची चिंता करू नका. आयोगाला आम्ही काही तो हिशेब देऊ, असे धक्कादायक विधान महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भरसभेत केले.
गडचिरोलीत भाजपच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन आणि प्रचार सभा पार पडली. यावेळी काहीजण उन्हामध्ये बसल्याचे दिसून आले. तेव्हा महसूलमंत्री बावनकुळे यांनी मंडप पूर्ण का नाही टाकला? याबाबत विचारणा केली. त्यावर जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे यांनी खर्चाचे कारण पुढे करताच बावनकुळे यांनी तुम्ही खर्चाची चिंता करू नका, असे त्यांना बजावले.
आयोगाला मी खर्चाचा हिशेब देतो
निवडणूक आयोगाला आपण हिशेब देऊ. तुम्ही हिशेबासाठी घाबरू नका. तुम्ही एक पडदा टाकला तर आपण तो 50 रुपयांचा असल्याचे सांगू. मी स्टार प्रचारक आहे. कशाला हिशेब लागतो? मी राज्यावर आहे, राज्यात आम्ही हिशेब देऊ, असे बावनकुळे म्हणाले.




























































