बीयरसाठी 10 रुपये जास्त घेतल्याने 25 हजारांचा दंड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बीयर बॉटलवर छापलेल्या किमतीपेक्षा ग्राहकांकडून 10 रुपये जास्तीचे घेणे एका दुकानदाराला चांगलेच महागात पडले. केरळमधील पठाणमथिट्टा येथील जिल्हा ग्राहक विवाद निवारण आयोगाने ‘केरळ स्टेट बेव्हरेजेस कॉर्पोरेशन’ला ग्राहकाची फसवणूक केल्याबद्दल 25,000 रुपयांची नुकसानभरपाई आणि कायदेशीर खर्च देण्याचे आदेश दिले आहेत.

आयोगाचे अध्यक्ष जॉर्ज बेबी आणि सदस्य निशाद थंकप्पन यांच्या खंडपीठाने हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला. ‘एमआरपी’पेक्षा जास्त पैसे आकारणे हे ग्राहक संरक्षण कायदा, 2019 चे उल्लंघन असल्याचा ठपका न्यायालयाने ठेवला. अशा प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी कडक दंडात्मक कारवाई आवश्यक असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. एका दुकानदाराने बीयरसाठी 170 रुपये ऐवजी ग्राहकाकडून 180 रुपये वसूल केले होते.