
प्रा. मधुकर तोरडमल यांच्या सहकाऱयांनी सुरू केलेला ‘मधुकर तोरडमल स्मृती चतुरस्र रंगकर्मी’ पुरस्कार रत्नागिरीतील ज्येष्ठ कलावंत सुहास भोळे यांना जाहीर झाला आहे. पाच हजार रुपये रोख आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
पुरस्काराचे हे पाचवे वर्ष असून चतुरस्र कलावंताला हा पुरस्कार जाहीर करण्यात येतो. यापूर्वी हा पुरस्कार नेताजी भोईर, संतोष पवार, राजन पाटील, जनार्दन लवंगारे यांना प्राप्त झाला होता. याचे वितरण 24 जुलै रोजी मुंबईत करण्यात येणार आहे. तोरडमल यांचे आप्त आणि शिष्य यांच्यातर्फे ‘मधुकर तोरडमल स्मृती चतुरस्र रंगकर्मी पुरस्कार’ दिला जातो. नाटय़क्षेत्रात प्रदीर्घ कार्य केलेल्या रंगकर्मीस हा पुरस्कार दिला जातो.





























































